Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा ‘कहर’ सुरूच ! गेल्या 24 तासात 8641 नवे पॉझिटिव्ह तर 266 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची 6 ते 7 हजारांच्या आसपास होती. आज करोना बाधित रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 8641 रुग्ण आढळून आले आहेत. तर 266 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार 281 इतकी झाली असून राज्यात रुग्ण वाढीचा दर 19.65 टक्के झाला आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आजपर्यत 1 लाख 58 हजार 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.63 टक्के इतके झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनामुक्त होण्याचा आकडा दीड लाखांच्या वर गेल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 266 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्य़ंत 11 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 3.94 टक्के इतका झाला आहे. सध्या 7 लाख 10 हजार 394 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 42 हजार 833 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यामध्ये 1 लाख 14 हजार 648 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.