शिवसेना, भाजपाकडून एकमेकांना ‘चेकमेट’ देण्याचा प्रयत्न, राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपाकडून जोरदार हालचालींना सुरवात झाली आहे. त्यामध्येच शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष दबावाचं राजकारण करीत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे तर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपालांची भेटी घेणार आहेत. भाजप आणि सेनेचे सत्तेचा फॉर्म्युला लोकसभेच्या वेळा 50-50 असा ठरलेला असलेला तरी त्यावर शिक्कामोर्तब झालं नाही.

त्याच पार्श्वभुमीवर महायुतीमधील दोन्ही मोठे पक्ष राज्यपालांना स्वतंत्र भेटत असल्याने ते दोघेही एकमेकांना चेकमेट देण्याच्या प्रयत्नात असल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपुर्वीच फॉम्युला ठरलेला आहे हे शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जातं. त्यावर शिवसेना ठामही आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये चढाओढ पहावयास मिळते. त्याच पार्श्वभुमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली अशी चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटले असे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, मुंबईचा महापौर असल्यापासून आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटतो. दरम्यान, काही वेळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. मात्र, ही भेट नेमक्या कोणत्या कारणांसाठी घेण्यात येत आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, सध्या तरी राज्यात शिवसेना आणि भाजपा एकमेकांना चेकमेट देत असताना दिसतं आहे. मुख्यमंत्र्यांनी काही वेळापुर्वीच राज्यपालांची भेट घेतली असून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून त्याबाबत सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत देखील राज्यपालांना माहिती देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये नमुद केलं आहे.

Visit : Policenama.com