#Video : सरकारचा महत्वाचा निर्णय ; शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या ‘स्कॉलरशिप’मध्ये वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहशतवादी आणि माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबाबत नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

राष्ट्रीय संरक्षण निधीत मोठे फेरबदल करून दहशतवादी आणि माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी स्कॉलरशिपअंतर्गत मुलांसाठी दोन हजार रुपये मिळत होते. तर आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून ती २५०० रुपये करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी यापूर्वी २२५० रुपये देण्यात येत होते. मात्र त्यामध्ये वाढ करत ३००० रुपये स्कॉलरशिप मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय संरक्षण निधीची १९६२ मध्ये स्थापना करण्यात आली आहे. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरला जातो. या योजनेअंतर्गत देशातील शहिद झालेल्या सैनिकांच्या मुलांना स्कॉलरशिप देण्यात येते.

Loading...
You might also like