Pune : मराठा आरक्षण परिषद रद्द, खा. उदयनराजेंकडून आमंत्रितांना बैठक रद्द झाल्याचा निरोप

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन –   खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्त्वाखाली ( bjp-mp-udayanraje-bhosale) शुक्रवारी (दि. 30) पुण्यात मराठा आरक्षण परिषद (maratha-reservation) आयोजित केली होती. परंतु, ही परिषद आता रद्द (cancelled) झाल्याचे समजते. या बैठकीसाठी ज्यांना आमंत्रित केले होते. त्या सर्वांना परिषद रद्द केल्याचा निरोप खा. भोसले यांच्याकडून पाठवण्यात आला आहे. पण अचानक ही आरक्षण परिषद का रद्द केली गेली याचे कारण समजू शकले नाही. मराठा आरक्षण परिषदेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठेतरी सुटेल, ही अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. पण बैठक रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

खा. भोसले यांनी मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज दुपारी दोन वाजता या परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेसाठी खासदार उदयनराजेंसोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणारे वकील, याचिकाकर्ते, अभ्यासक उपस्थित राहणार होते. परिषदेत मराठा आरक्षणाची पुढील लढाई कोणत्या पद्धतीने लढावी, याची दिशा निश्चित करण्यात येणार होती. दरम्यान, मराठा आरक्षण परिषद रद्द करण्याचा निर्णय उदयनराजे यांनीच घेतला आहे. खा. भोसले सध्या पुण्यातच आहेत. तसेच ते परिषदेचे आयोजन ज्या रेसिडेन्सी क्लबमध्ये केले होते. त्याठिकाणी येणार असेही सांगितले जात होते.