‘द ग्रीन इंडिया’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘झाड’चं शूटिंग समाप्त

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कलाकारांचा बाले किल्ला म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. याच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कासारी गावचे सुपुत्र ‘झाड’ चित्रपटाचे निर्माते सचिन डोईफोडे, दिग्दर्शक प्रल्हाद उजगरे यांच्यासह गावातील बाल कलाकार ग्रामीण भागातून ‘द ग्रीन इंडिया’ प्रस्तुत ‘झाड’ या मराठी चित्रपटाची शूटिंग गेल्या दीड महिन्यापासून गाव पातळीवर सुरू आहे.

केज तालुक्यातील कासारी सह परिसरातील विविध गावांमध्ये ’द ग्रीन इंडिया‘ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘झाड’ या चित्रपटाची शुटिंग गेल्या दीड महिन्यापासून सुरु आहे. ग्रामीण भागातील झाडांमुळे मानवाला होणारे फायदे, निसर्गाचं वातावरण संतुलित राहण्यासाठी झाड किती महत्वाचं आहे हे ‘झाड’ या चित्रपटातून मानवांना मोलाचा संदेश दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना मिळणारा वाव शुटिंग दरम्यान आलेला अनुभव हा खरोखरच एक प्रेरणादायी होता. बीड जिल्ह्यातील मागास असलेल्या कासारी गावात नामवंत मराठी कलाकार येऊन ग्रामीण भागात आनंद घेत ‘झाड’ या मराठी चित्रपटाची शूटिंग केली.

यावेळी गावातील तरुणांसह नागरिकांनी ’द ग्रीन इंडिया’ प्रस्तूत मराठी चित्रपट ‘झाड’ या चित्रपटाचे निर्माते सचिन डोईफोडे, दिग्दर्शक प्रल्हाद उजगरे, अभिनेता प्रकाश धोत्रे, कैलास मुंडे, दिलीप डोईफोडे, अभिनेत्री श्रीमसेवाल, काजल थिटे, प्रियंका नेरकर, सह बालकलाकार पंकजा ज्ञानोबा वायबसे, म्युझिक डायरेक्टर, शरद ठोंबरे, कॅमेरामन सतीश सांडभोर पुणे, गणेश मायकर-बीड, सचिन आंधळे, जयदेव वायबसे, संदिप वायबसे, महादेव काकडे, श्रध्दा वायबसे यासह आदी कलाकारांना गावकर्‍यांनी मोलाचे सहकार्य केले.

या चित्रपटामुळे केज तालुक्यातील गाव-गावात, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रमाणात झाडांची निर्मिती झाल्यास पर्यावरण संतुलित राहण्यासाठी ‘झाड’ या मराठी चित्रपटाची भूमिका निश्चित बीड जिल्ह्याच्या कामी येईल. झाड या चित्रपटाचा मुख्य हेतू हा आहे की, निसर्गाचा समतोल राखला जावा. यासाठी केज तालुक्यातील कासारी सह परिसरातील गावांमध्ये या चित्रपटाची शूटिंग करण्यात आली. त्याचबरोबर त्या गावातील अनेक कलाकारांसह बालकलाकारांनाही संधी मिळाली. आपली मुले या चित्रपटात असल्याकारणाने अनेकांनी या चित्रपटाचे स्वागत केले. झाड या चित्रपटाचे चित्रीकरण रात्री-अपरात्री, सकाळ-पहाटे अशावेळी तब्बल दीड महिन्यापासून केज तालुक्यात घेण्यात आलं. या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता कैलास मुंडे यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल अशी अपेक्षा सर्व कलाकांरांसह कासारी गावर्‍यांना आहे. या चित्रपटाचे टेलर लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी कळवले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like