Maval Lok Sabha Election 2024 | अजितदादांनी तंबी देऊनही राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आजही माझ्या संपर्कात : संजोग वाघेरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maval Lok Sabha Election 2024 | अजित पवारांनी (Ajit Pawar) मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi-MVA) उमेदवार संजोग वाघेरे यांना भेटू नका, अशी तंबी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत. मला भेटत आहेत, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे मावळमधील उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Maval Lok Sabha Election 2024 )

मावळमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे निवडणूक रिंगणात आहेत. ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांनी केलेल्या या वक्तव्याने मावळच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

संजोग वाघेरे हे एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महत्त्वाची पदे भुषविली होती. आता ते ठाकरे गटाचे उमेदवार असल्याने महायुती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांची विरोधक आहे. मात्र, संजोग वाघेरे यांची जुन्या पक्षाशी संपर्क तुटलेला नाही. याचा फायदा मावळ लोकसभेच्या निवडणुकीत संजोग वाघेरे यांना होईल, अशी येथे चर्चा आहे.

सध्या मावळ मतदार संघातील बारणे विरूद्ध वाघेरे यांच्यातील लढत चर्चेत आहे.
संजोग वाघेरे यांनी आपला प्रचार आता आक्रमक केला असून ते मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न
उपस्थित करून श्रीरंग बारणे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये यश येतानाही दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार