लष्करी जवानला पत्नीनं ‘कटाई’च्या बहाण्यानं नेलं शेतात, हत्याराला धार लावून बसलेल्या दीरानं केलं काम ‘तमाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मंगळवारी उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात जवानांच्या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी मृताची पत्नी आणि त्याच्या सख्ख्या भावाला अटक केली आहे. सीओ सदर देहात अखिलेश भदोरिया यांनी गंगा नगर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन या खळबळजनक हत्येचा खुलासा केला. दरम्यान, परीक्षितगड पोलिस स्टेशन परिसरातील दुर्वेशपूर गावात मंगळवारी रात्री बीएसएफच्या जवान संजीवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

दरम्यान, संजीव श्रीनगरच्या कुपवाडा येथे तैनात होता. अचानक तो १५ दिवसांची रजा घेत एक दिवस आधीच घरी आला. त्यानंतर त्याची पत्नी गीतांजली त्याला मंगळवारी संध्याकाळी भाजी तोडण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेली. मात्र, गीतांजलीने सांगितले की, अज्ञात इसमांनी गोळ्या घालून पतीची हत्या केली. दुसरीकडे, घटनेनंतर पोलिसांना गीतांजलीवर संशय आला.

अवैध संबंधांमुळे खून :
बुधवारी गंगा नगर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सीओ सदर देहात अखिलेश भदौरिया यांनी खुनाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, संजीवचे केवळ एका वर्षापूर्वी गीतांजलीशी लग्न झाले होते. संजीव नोकरीवर गेल्यानंतर गीतांजलीचे तिचा दीर गुलाबसिंग उर्फ गुल्लूशी अवैध संबंध बनले. दुसरीकडे संजीव जेव्हा जेव्हा सुट्टीच्या दिवशी घरी यायचा, तेव्हा तो गीतांजलीवर अत्याचार करीत असे.

या गोष्टीला कंटाळून गीतांजलीने तिचा दीर गुल्लू याच्यासह पती संजीवला ठार मारण्याची योजना आखली. योजनेनुसार मंगळवारी गीतांजली संजीवला शेतात घेऊन गेली. जिथे आधीच आलेल्या गुल्लूने डोक्यात गोळी झाडून भावाची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, हत्येत वापरलेली पिस्तूल आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे. यासह दोन्ही आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like