Methi For Diabetes | डायबिटीजचे रुग्णांनी रोज या पद्धतीने करावे मेथीचे सेवन, नियंत्रणात राहील Blood Sugar

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Methi For Diabetes | मेथी हा असा मसाला आहे जो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. मेथीच्या सेवनाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवता येते. मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. मेथीचे दररोज सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवता येते. (Methi For Diabetes)

 

मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. याच्या सेवनाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यामध्ये अमिनो अ‍ॅसिड असते (Amino Acids). अमीनो अ‍ॅसिड ब्लड शुगरचे प्रमाण कमी करण्यास आणि त्याची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढते, आणि मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. मेथीचे सेवन कोणत्या पद्धतीने करता येऊ शकते ते जाणून घेवूयात. (Methi For Diabetes)

 

1 जेवण –
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या जेवणात मेथीचा वापर करू शकता. भाजीत घालून खाऊ शकता. त्यामुळे भाजीची चव वाढण्यासही मदत होऊ शकते.

 

2. मेथीचे पाणी –
रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी (Fenugreek water) प्यायल्याने ब्लड शुगर कंट्रोल राहते.
दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी हे पाणी गाळून प्या.

3. चावून खा –
मेथी चावून खाल्ली तर आणखीनच चांगले आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे चावून खावे आणि नंतर पाणी प्यावे.
त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Methi For Diabetes | methi for diabetes diabetes patients should consume fenugreek seeds daily in these ways blood sugar levels will be under control

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा; म्हणाले – ‘काका-पुतण्याला मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही’

 

Pune News | रायरेश्वर किल्ल्यावर तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु

 

Pune Crime | कबुतराची विष्ठा, पंखाच्या त्रासाची तक्रार केल्याने मित्राच्या मदतीने तरुणाच्या खूनाचा प्रयत्न