MLA Siddharth Shirole | वारजे परिसरात बिबट्याचा वावर वाढला, सरकारने उपाययोजना करावी; आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Siddharth Shirole | बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर वारजे परिसरात वाढला आहे (Leopard In Warje Pune) . अशा घटना वारंवार घडत आहेत. याची दखल घेऊन सरकारने (Shinde-Fadnavis Govt) उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी आज (सोमवारी) विधानसभेत केली.
वारजे परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचा मुद्दा पॉईंट ऑफ इन्फर्मेशन द्वारे आ.शिरोळे यांनी सभागृहात उपस्थित केला. आज सकाळी पुणे शहर परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे (New Ahire Gaon Pune) परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. परंतु नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, असे आ.शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी सांगितले.
या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA Pune) आहे. तिथे जवळच असलेल्या जंगलातून बिबट्या मानवी वस्तीत शिरला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पूर्वीही या परिसरात बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार येथे बिबट्या दिसत असल्याने अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आ.शिरोळे यांनी सभागृहात बोलताना केली.
Web Title : MLA Siddharth Shirole | Leopards increase in Warje area, government should take measures; MLA Siddharth Shirole
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा