मुंबईत काॅंग्रेसच्या प्रचाराला मनसेचे ‘इंजिन’

मुंंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. तसा प्रचाराला वेग येत आहे. आज (शनिवरा) मुंबई कॉंग्रेसच्या प्रचाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामध्ये मुंबई दक्षिण मध्यचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या पदयात्रेत सहभाग घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदिप देशपांडे यांनी शिवजीपार्क येथे प्रचार केला.

महाराष्ट्र नवनिर्माणसेना ही लोकसभा निवडणूक लढणार नाही. मात्र, राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात प्रचार करणार हे स्पष्ट केले आहे. तसेच या निवडणूकीत आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पायउतार करायचे आहे. त्यासंदर्भात मागच्या आठवड्यात घेण्यात आलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना तसे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळेच मुंबईत गायकवाड यांच्या प्रचार पदयात्रेत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत त्याचा प्रचार केला.

या मतदारसंघात शिवसेनेकडून राहुल शेवाळे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात आता मनसे कॉंग्रेसचा प्रचार करत असल्याने नवे समिकरण बघायला मिळाले आहे. आता नेमकं काय चित्र असणार हे पाहणे औत्स्युक्याचं ठरणार आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेने १९९१ पासून २००४ पर्यंत एकहाती सत्ता राखली होती. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने हा मतदारसंघ हिसकावून घेतला होता. मात्र, त्यानंतर शिवसेनेने पुन्हा २०१४ ला राहुल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव करत पुन्हा आपला बालेक्कीला ताब्यात घेतला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like