विधानसभा 2019 : मनसे विधानसभा लढवणार, पहिला उमेदवार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे रिंगणात उतरणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले असताना मनसे निवडणुकीत उतरणार का याबाबत स्पष्ट होत नव्हते. मात्र, आज राज ठाकरे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा –
मुंबईमधील वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचा मेळावा आज झाला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच मनसेची पहिली प्रचारसभा 5 ऑक्टोबरला घेण्यात येईल असे देखील जाहीर केले. मात्र, ही प्रचारसभा कोठे घेणार हे अद्याप राज ठाकरे यांनी स्पष्ट केले नाही. तसेच मनसे किती जागांवर निवडणूक लढवणार याचीही माहिती राज ठाकरे यांनी दिली नाही. 5 तारखेला सर्व स्पष्ट होईल असे राज ठाकरे यांनी सांगितले.

पहिला उमेदावर जाहीर –
मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केला असून ते मनसेकडून निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. तर नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातार यांनी देखील मनसेमध्ये प्रवेश केला असून ते देखील मनसेकडून निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले.

Visit : policenama.com