लवकरच सर्वांचे मोबाईल नंबर होणार 11 अंकी, जाणून घ्या याबद्दलच्या 8 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साधारणपणे आपला मोबाईल क्रमांक 10 आकडी असतो. मात्र ट्रायने हाच क्रमांक 11 आकडी करण्याचा विचार सुरु केला आहे. यासाठी ट्रायने काही सूचना देखील मागवल्या आहेत. ट्रायने यासंबंधी एक पत्रक काढले आहे. ‘एकीकृत अंक योजना का विकास’ असे या योजनेचे आव असून मोबाईल क्रमांक आणि लँडलाईन क्रमांक दोन्हीमध्ये हा बदल करू शकतो. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि वाढते ग्राहक या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे ट्रायने सांगितले आहे.

   यासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी

1) मोबाइल्सची वाढती मागणी यामागील प्रमुख कारण आहे.

 2) ट्राय यावर विविध प्रकारे काम करत असून यामध्ये या योजनेचा देखील समावेश आहे. त्यामुळे  9, 8 आणि  7  या क्रमांकाने जवळपास भारतात नवीन 210 कोटी मोबाईल क्रमांक तयार केले जाऊ शकतात.

3) 2050 पर्यंत देशात सध्या असलेल्या क्रमांकांव्यतिरिक्त जवळपास 260 कोटी नवीन क्रमांकांची गरज पडणार आहे. याआधी दोन वेळा भारतात या क्रमांकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 1993 आणि 2003 मध्ये जवळपास यामुळे नवीन 75 कोटी क्रमांक तयार करण्यात आले होते.

4) मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे यामध्ये बदल करावा लागत असल्याचे ट्रायने म्हटले आहे. तसेच केवळ मोबाईल क्रमांकच नाही  तर फिक्स्ड लाइन नंबर देखील 10 नंबर डिजिटमध्ये बदल करण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like