मोहरम मिरवणुकींना परवानगी नाही

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा. मोहरम निमित्त काढण्यात येणाऱ्या मातम मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. २८, २९ व ३० ऑगस्ट हे तीन दिवस मोहरमसंदर्भात महत्वाचे असून, हा दुखवटा पाळण्याबाबतही गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

कोरोना काळात पार पडलेल्या रमजानचा पवित्र महिना रमजान ईद ,बकरी ईद व इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम दरम्यानही घरात राहूनच दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. खासगी मातमदेखील शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घरीच करावेत. सोसासटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये.

ADV

मोहरम निमित्ताने कॅम्प, रविवार पेठ, कोंढवा येथे ताबुत बसविले जातात. बारा इमाम, गोडेपीर कोंढवा अशोका मिऊज परिसरात मोहरमनिमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मिरवणुक काढली जाते. यंदा मात्र या मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पोलिसनामा ऑनलाईन ला सांगितले की, यंदा ताबूत जाग्यांवरच विसर्जन केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून मिरवणुकांना परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत सर्व परिसरात बैठका घेऊन नागरिकांना याबाबत शासनाचे काय आदेश आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे बावचे यांनी सांगितले.