पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाल तर कमी होईल रोगप्रतिकारक शक्ती ! ‘ही’ घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या काळात लोकांना रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यास सांगितलं जात आहे. अशात आता पावसाळाही सुरू आहे. या दिवसात लोक जास्त आजारी पडतात. त्यामुळं या दिवसात तुम्ही काही पदार्थांचं सेवन टाळलं तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहिल आणि पावसाळ्यातील आजारांसोबत तुम्ही कोरोनापासून दूर रहाल. यासाठी काय काळजी घ्यावी आणि कोणते पदार्थ टाळावेत हे आपण जाणून घेऊयात. पावसाळ्यातील ओलावा आणि चिखल यामुळं पालेभाज्या फ्रेश मिळतील की नाही हे सांगता येत नाही. दूषित पाण्यातील पालेभाज्या खाल्ल्यानं रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून पालेभाज्या घरी आणल्यानंतर गरम पाण्यानं किंवा मिठाच्या पाण्यानं चांगल्या धुवून घ्या.

या दिवसात प्रजननाचा काळ असतो. त्यामुळं जर तुम्ही माशांचं सेवन केलं तर अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. तुम्हाला मासे किती आवडत असले तरीही समुद्रातील मासे खाणं काही दिवस टाळायला हवं. जर तुम्हाला खूपच मासे खाण्याची इच्छा झाली तर किमान फ्रेश आणि चांगले शिजलेले मासे खा.या दिवसात तेलकट पदार्थ टाळावेत. कारण जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर पचनक्रिया संथ गतीनं होते. यामुळं पोटाचे विकार होऊ शकतात. म्हणून अशा पदार्थांचं सेवन टाळावं किंवा शक्य तितकं सेवन कमी करावं. कच्च्या भाज्या खात असाल तर असं अजिबात करू नका. याशिवाय फळांचं सेवन करताना नीट स्वच्छ करून घ्या मगच खा. कोणतेही बाहेरील आणि पचनक्रियेसाठी घातक ठरतील असे पदार्थ खावू नयेत. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो.

काय काळजी घ्यावी
– जेवणात रोज हळद, जीरे, धने, लसूण अशा मसल्याच्या पदार्थांचा वापर करावा. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहिल.

– जास्तीत जास्त गरम पाणी प्या. यामुळं जठराग्नी व्यवस्थित राहतो आणि तुम्हाला कमी आजार उद्भवतात.

– गरम पाण्याचा असाही फायदा होतो की, पोटाचा एन्ट्री पॉईंट म्हणजेच घशात काही विषाणू असतील तर तेही नष्ट होतात.