MP Supriya Sule | पुणे मनपाला दिलेला 200 कोटींचा निधी गेला कुठे? त्याची ED, CBI चौकशी करा

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून कचरा प्रकल्पासाठी जवळपास 200 कोटी रुपये दिले आहेत. मात्र त्या पैशातून कोणत्याही प्रकाराच्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे हा निधी गेला कुठ गेला याची सीबीआय आणि ईडीमार्फत (ED, CBI) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (NCP leader MP Supriya Sule) यांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देखील मी या संदर्भातील चौकशीची मागणी करणार आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दादा यातून निश्चित मार्ग काढेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी खासदार सुळे यांनी सोमवारी (दि. 28) केली. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. गेल्या कित्येक वर्षापासून शहरातील कचरा उरुळी देवाची आणि रामटेकडी येथील कचरा डेपोत येत आहे. येथे आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र सध्या डेपोतील परिस्थिती लक्षात घेतली तर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केल्याचे दिसत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत वेळोवेळी कचरा प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी जवळपास 200 कोटींचा निधी दिला गेला आहे. मग हा निधी गेला कुठे असा प्रश्न निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

Web Titel :- mp supriya sule | ed cbi inquiry should be done for garbage management fund given to pune municipal corporation says supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक