सख्ख्या भावांच्या गाडीला अपघात, 24 वर्षीय तरुणाच्या डोळ्यासमोर लहान भावानं सोडला जीव

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाईन – बाईकनं एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात एका 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-अमहदाबाद महामार्गावर हा अपघात झाला. यात एक 24 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला आहे. सागर सुनील हरणे असं या तरूणाचं नाव आहे. तर 22 वर्षीय मृत तरुणाचं नाव सुरज सुनील हरणे आहे.

सदर दोन्ही तरुण कशिद कोपरवरून सातिवली येथे कामावर जात होते. पेल्हार या ठिकाणी ट्रक मधोमध होता. याच ट्रकला दुचाकीनं जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, 22 वर्षीय तरूण सुरज हा जागीच मरण पावला. 24 वर्षीय सागर मात्र सध्या मृत्यूसोबत झुंज देत आहे. सागरला उपचारासाठी मीरारोड येथे हलवण्यात आलं होतं.

महामार्गावरील पेल्हार येथे पहिल्या लेनवर बंद ट्रक होता. दुरुस्तीसाठी हा ट्रक उभा करण्यात आला होता. याचवेळी वेगात आलेल्या दुचाकीनं ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात बाईक चक्काचूर झाली. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत अपघातात वाचलेला आणि जखमी झालेल्याला उपचारासाठी दवाखान्यात नेलं.