धक्कादायक ! मुंबईतील कंपनीच्या MD चे फाईव्ह स्टार हॉटेलमधून अपहरण

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीतील चाणक्यपुरी येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून मुंबईतील एका मरीन इंजिनियरिंग कंपनीच्या व्यवस्थापकिय संचालकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकऱणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केल्यानंतर अपहरणनाट्यावर पडदा पडला. ३० लाखांसाठी ६ तास चाललेल्या या अपहरणात ४ महिलांचा समावेश आहे.

दिल्ली पोलिसांना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास एक फोन आला. त्यांनी व्यवस्थापकिय संचालकांना ओलीस ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सीसटिव्ही तपासले तेव्हा व्यवस्थापकिय संचालक एका महिलेसोबत बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. हॉटेलच्या आवारातील एका कारमध्ये दोघे बसले आणि त्या गाडीतून निघून गेले. त्यानंतर अपहरणकर्ते सतत कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून खंडणी मागत होते. दरम्यान पोलिसांनी त्या गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून गाडीचा शोध सुरु केला.

कारमालकाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा तो देखील या कटात सामील असल्याचे समोर आले. संचालकाला एका लक्ष्मी नगर मधील एका घरात ठेवण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी तेथे छापा टाकून त्यांची सुटका केली आणि रुग्णालयात दाखल केले. दरम्यान व्यवस्थापकीय संचालक हे एका बिझनेस ट्रीपसाठी दिल्लीला आले होते. त्यावेळी शुक्रवारी सायंकाळी त्यांना एका महिलेचा फोन आला. ती त्यांच्या ओळखीची होती. त्या महिलेने त्यांना एका महिलेशी भेटवायचे होते. त्यामनंतर ती आणखी एका महिलेला घेऊन आली होती. त्यानंतर त्यांना इतर दोन महिलांशी तिने भेटवले. आणि अपहरण केले.

You might also like