पालिका प्रभाग निवडणुकीतही भाजपच सरस

चिठ्ठीही भाजपलाच अनुकूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-  महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका आज (सोमवार) झाल्या. त्यात संख्याबळानुसार भाजपनेच पुन्हा वर्चस्व मिळविले.

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात भाजप आणि विरोधातील काँग्रेस आघाडी यांची समसमान मते असल्याने चिठ्ठीद्वारे अध्यक्ष निवडण्यात आला त्यातही भाजपच्या बाजुनेच निकाल लागला.

महापालिकेची प्रभाग समिती आणि निवडून आलेले अध्यक्ष पुढीलप्रमाणे :
१)औंध, बाणेर : ज्योती कळमकर.२)घोले रोड : आदित्य माळवे. ३)सिंगड रोड : नीता दांगट. ४)वानवडी, रामटेकडी : रत्नप्रभा जगताप ५)कोंढवा, येवलेवाडी : मनिषा कदम. ६)कसबा, विश्रामबागवाडा : स्मिता वस्ते. ७)बिबवेवाडी : प्रविण चोरबेले. ८)येरवडा, कळस, धानोरी : मारुती सांगडे. ९)कोथरूड, बावधन : छाया मारणे. १०)नगर रोड : मुक्ता जगताप. ११)ढोले पाटील : मंगला मंत्री. १२)धनकवडी, सहकारनगर : युवराज बेलदरे. १३)वारजे, कर्वेनगर : जयंत भावे १४)हडपसर, मुंढवा : पूजा कोद्रे. १५)भवानी पेठ : सुलोचना कोंढरे

Loading...
You might also like