माहेरी आलेल्या विवाहीतेचा एकतर्फी प्रेमातून खून

सोलापूर :पोलिसनामा ऑनलाईन – सोलापूरमध्ये एकतर्फी प्रेमातून विवाहितेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. गळा दाबून खून करण्यात आल्याची हि धक्कादायक घटना घडली आहे. प्रियंका तुकाराम गोडगे असे या 20 वर्षीय मृत महिलेचे नाव असून ती या दिवाळी निमित्त माहेरी आली होती. राजू श्रीकांत शंके या तरुणावर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गोडगे हि महिला दिवाळी सणानिमित्त आपल्या माहेरी आली होती. त्यांना एक तीन वर्षाची लहान मुलगी असून आपल्या मुलीला बरे वाटत नसल्याने त्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी शंके याने या महिलेला रेल्वे लाईनजवळ नेले आणि गळा दाबून तिची हत्या केली. खूप वेळ झाल्यानंतरही ती घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता रेल्वे रूळाजवळ मृत आवस्तेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले असता मृत घोषित करण्यात आले. यांनतर मुलीचे वडील गोविंद कृष्णा चवरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी शंके याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्या त्रासामुळे सोडले कॉलेज
या महिलेचे लग्न होण्यापूर्वी देखील राजू शंके हा महिलेला त्रास देत होता. शंके हा प्रियंका हिच्या भावाचा मित्र होता. त्यामुळे ती नेहमी कॉलेजला येत जात असताना देखील तिची छेड काढून तो तिला त्रास देत होता. त्यामुळे तिने कॉलेजदेखील सोडले होते. मात्र त्याने त्रास देणे सुरूच ठेवले होते.

मुलीला दिले नातेवाईंकांकडे
राजू शंके याने प्रियांका हिला रेल्वे स्टेशनच्या पुलाजवळ नेल्यानंतर त्यांच्यात झटापट झाली. यावेळी त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मुलीला त्याने आपल्या मित्राला बोलावून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Visit : Policenama.com