नागपुरमधील बहुचर्चित हत्याकांडाचा पर्दाफाश, ४ कुख्यात गुंड गजाआड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमधील बहुचर्चित भुपेंद्रसिंह उर्फ बॉबी माकन यांच्या हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणात चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. माकन यांचे २५ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर गुन्हेगारांनी त्यांचा खून करून मृतदेह कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पुलाखाली टाकला होता.

पोलिसांनी बॉबी माकन यांचा मृतदेह पुलाखाली आढळून आल्यानंतर तपासाची चक्र फिरवत चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेले चौघेही कुख्यात गुन्हेगार आहेत. पोलिसांनी याप्रकरणात शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार लोहिया, गुरमितसिंग उर्फ बाबू खोकर, हरजीतसिंग उर्फ सिट्टू गौर, मनिंदरसिंग उर्फ हनी चंडोक यांना अटक केली आहे. मनजीत वाडे नावाचा पाचवा आरोपी फरार झाला आहे.

बॉबी माकन यांचे आणि आरोपींचे आपापसात असलेल्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे तपासात समोर आले आहे. २०१७ मध्ये या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार गुरुचरण लोहिया याच्यावर त्याच्याच ऑफिस बाहेर गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार मयत बॉबीने केल्याचा संशय लिटिल सरदारला होता, असे पोलिसांनी सांगितले.

तसेच फरार आरोपी मनजीतसिंह वाडे याच्या ऑफिसमध्ये चालणाऱ्या रमी क्लबमध्ये मयत बॉबीच्या सांगण्यावरून पोलिसांनी छापा टाकल्याचा संशय होता. याच रागातून आरोपींनी बॉबी माकन याचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading...
You might also like