Nana Patole | पंजाबच्या घटनेमागे HM अमित शहांचा तर हात नाही ना ? पटोले यांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबच्या (Punjab) दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ताफा अडवण्यात आल्यानं भाजपनं (BJP) काँग्रेस विरोधात रान उठवलं आहे. या प्रकरणावरुन दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यावरुन वादंग निर्माण झाले असताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अमित शाह (HM Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात नाही ना ? असा गंभीर आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वी पासून सर्व सुरक्षा व्यवस्था (Security Arrangement) पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी (SPG) या सर्वांच कंट्रोल करत असतात. एसपीडी (SDP) गृहखात्यांतर्गत येतात. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहा यांचा तर हात नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच याचे उत्तर दिले पाहिजे, असे करुन डाव साधायचा तर नव्हता ना हे देखील त्यांनी सांगितले पाहिजे, अशी शंका पटोले यांनी उपस्थित केली आहे.

पंतप्रधान रोज अनेक रुपं बदलतात

नाना पटोले पुढे म्हणाले, पाच राज्यातील निवडणुका (Election) जिंकण्यासाठी ही नौटंकी सुरु आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत आहे. पंतप्रधान रोज अनेक रुपं बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरु असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरु केली आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी व्हावं असेही पटोले यांनी म्हटले आहे.

 

चंद्रकांत पाटलांचा पलटवार

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले यांना कधी कोणी सीरिअसली घेत नाही. ते राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचं ऐकतो. पण एरव्ही ते कधीच सीरिअस नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी सीरिअसली पाहात नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

Web Title : Nana Patole | is amit shah behind pm modi s security breach in punjab says nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी