1984 शिख विरोधी दंगल प्रकरण ! जामीनासाठी कॉग्रेसचे सज्जनकुमार सुप्रीम कोर्टात पोहचले, SC नं फेटाळला जामीन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  दिल्लीमध्ये 1984 मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील मुख्य आरोपी व काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांनी केलेला जामीनाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. या अर्जाची सुनावणी जुलै महिन्यात करण्यात येईल असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन नाकारला.

मंडोली तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सज्जनकुमारांनी तब्येत खराब असल्याच्या कारणास्तव जमीनासाठी अर्ज केला होता पण न्यायालयाने तो फेटाळल्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकला नाही. गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुहेरी पीठाने 1984 शीखविरोधी दंगलप्रकरणी सज्जनकुमार यांना जन्मठेप आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.