शाळेनं नथुराम गोडसेला संघाच्या गणवेशात दाखवलं, RSS च्या आक्षेपानंतर मागितली ‘माफी’ !

जबलपूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका खासगी शाळेने महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात दाखविल्याबद्दल संघाची बिनशर्त माफी मागितली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या स्मॉल वंडरस सीनियर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीनिमित्त मूक नाटक सादर केले. त्यात महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा पोशाख आरएसएसचा गणवेश दाखविला गेला. यावर आरएसएसने कडक आक्षेप घेतला होता आणि म्हणूनच शाळेला माफी मागावी लागली.

संघाच्या गणवेशात ‘महात्मा गांधी’ वर चालवली गोळी –

नाटकामध्ये संघाचा पोशाख घातलेलया मुलाला महात्मा गांधींच्या वेशातील मुलावर गोळ्या झाडल्या. आरएसएस कार्यकर्ते यतींद्र उपाध्याय यांनी याबाबत लॉर्डगंज पुलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. नाटकाद्वारे आरएसएसला बदनाम करण्यात आले आहे. असे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे. भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि साक्षी महाराज यांच्या वक्तव्याचा इन्कार करीत फिर्यादी म्हणाले की गोडसे यांचा संघाशी संबंध नव्हता.

शाळा म्हणाली, गोडसे यांचा आरएसएसशी काही संबंध नाही

शहर पोलिस अधीक्षक दीपक मिश्रा म्हणाले की, आयपीसी (कलम 500 , मानहानी ) अंतर्गत पोलिसांना अहवाल देण्यात आला. ते म्हणाले की अशा तक्रारीसाठी पोलिसांनी चौकशी करण्याची गरज नाही आणि तक्रारदाराला कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागेल. मात्र, शाळा व्यवस्थापनाने शुक्रवारी फेसबुकवर याबाबत माफी मागितली. व्यवस्थापनाने पोस्टमध्ये लिहिले की, ‘हे मूक नाटक छोट्या वर्गातील मुलांनी सादर केले. आरएसएसच्या ड्रेसमध्ये गोडसे दर्शविणे ही एक चूक होती. हे नकळत घडले, त्यामागे कोणतीही राजकीय विचारसरणी नव्हती. गोडसे यांचा आरएसएसशी काही संबंध नाही. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

 

Visit : Policenama.com