ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे ‘हे’ 3 दिग्गज नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवारी) सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, सरकार स्थापन झाल्यानंतर उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली तर काँग्रेसच्या अहमद पटेल आणि इतर नेत्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेवुन भुमिका मांडली. दरम्यान, अजित पवार हे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतील घरी थांबले आहेत. अजित पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आणि हसन मुश्रीफ रवाना झाले.

अजित पवार हे स्पष्ट वक्तव्य करतात. विधिमंडळामध्ये अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांची व्हेवलेन्थ चांगली जुळते. त्यामुळेच हे 3 मोठे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहचले. अजित पवारांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांकडे दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास पोहचले. त्यांच्यामध्ये चर्चा चालु झाली आहे. त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे काही वेळानंतर समजणार आहे.

Visit : Policenama.com