NCP Chief Sharad Pawar | ‘देवेंद्र फडणवीसांनी बाकीची वक्तव्य करण्यापेक्षा….’, शरद पवारांचा फडणवीसांना टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी गुरुवारी (दि.29) पत्रकार परिषद घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. दीड वर्षात राज्यातून 6 हजार 889 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी (Protection of Women) उपाय केले पाहिजेत, असा टोला शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, महाराष्ट्रातील राज्य सरकारला (State Government) सत्तेत येऊन एक वर्ष झालं. राज्यात अनेक प्रश्न आहेत. परंतु माझ्या दृष्टीने क्रमांक एकचा प्रश्न आहे तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order). महिला आणि मुली यांच्यावरील हल्ले, बेपत्ता (Missing) होणं या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याबाबत काही भागाची अधिकृत माहिती सरकारकडून मागवली मात्र सगळ्या महापालिका क्षेत्राची माहिती मिळाली नसल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले, पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील माहिती प्राप्त झाली असून 23 जानेवारी ते 23 मे या कालावधीत पुण्यातून (PMC) 937, ठाण्यातून (Thane) 721, मुंबई (Mumbai) 738 आणि सोलापूरातून (Solapur) 62 मुली अथवा महिला बेपत्ता झाल्या आहेत. या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 2458 मुली अथवा महिला बेपत्ता झाल्या आहेत.

बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशीम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदीया या जिल्ह्यांच्या ग्रमीण भागातून 23 जानेवारी ते 23 मे या कालावधी आणि त्यापूर्वीच्या कालावधीत 4431 मुली किंवा महिला बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

दीड वर्षाच्या काळात बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या 6 हजार 889 इतकी आहे. माझ्यामते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत. बेपत्ता महिलांचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | sharad pawar on devendra fadnavis over maharashtra women security

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा