NCP Jitendra Awhad On Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका, आजपर्यंत एकदाही पक्षाचे पद उपभोगले नाही, दादा गटाने दिले प्रत्युतर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Jitendra Awhad On Ajit Pawar | अजित पवारांचा कुठलाही हातभार पक्षविस्तारात नाही किंवा त्यांची भूमिकाही नाही. त्यांना केवळ पक्षावर ताबा हवा. पक्ष संघटनेत त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही. ते फक्त राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. ही फूट पक्षातंर्गत नाही नसून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार गटाने पक्षावर दावा केला, असा गंभीर आरोप शुक्रवारच्या सुनावणीत पवार गटाच्या वकिलांनी केला. (NCP Jitendra Awhad On Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. कालच्या सुनावणीबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील अजित पवारांवर जोरदार टीका केली. यानंतर अजित पवार गटाने देखील प्रत्युत्तर दिले आहे. (NCP Jitendra Awhad On Ajit Pawar)

अजित पवारांवर टीकास्त्र सोडताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांनी घामाचा एक एक थेंब गाळून हा पक्ष वाढवला आहे. २००४ मध्ये तोंडातून रक्त वाहत असतानाही प्रचाराला फिरले. मांडीचे हाड मोडले असतानाही पक्षाचे काम केले. त्याला पक्षासाठी प्राण देणे म्हणतात. अजित पवारांनी आजपर्यंत एकदाही पक्षाचे पद उपभोगले नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यात, एका पोराला मोठं करण्यात बापाचे योगदान असते तर शरद पवारांनी पक्षासाठी दिले आहे.

आव्हाडांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सूरज चव्हाण यांनी म्हटले की, अजित पवार आणि शरद पवारांनी तुम्हाला राज्यात वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपद देत राज्यात काम करण्याची संधी दिली.आता महाविकास आघाडीत गृहनिर्माणसारखे इतके मोठे पद दिले.

चव्हाण यांनी पुढे म्हटले की, तुम्हाला एवढे सर्व दिले असताना ठाणे,
पालघर जिल्ह्यात तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोक राष्ट्रवादी सोडून गेले
आणि तुमचे पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीने अजितदादांच्या नेतृत्वाला बोलणे म्हणजे आकाशाला लाथा मारण्यासारखे आहे असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आव्हाडांना दिले आहे.

दरम्यान, शुक्रवारच्या सुनावणीत शरद पवार गटाने २०१९ पासूनचा घटनाक्रम वाचून दाखवत
अजित पवारांचा पक्ष बांधणीत कोणताही सहभाग नव्हता,
केवळ सत्ता आली की ते मंत्रीपदे उपभोगण्यासाठी ते सर्वात पुढे होते, हे दाखवून देण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case News | वेअर हाऊसच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी लाच घेताना सहकार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Pimpri Chinchwad Crime News | चोरी करण्यास नकार दिल्याने महिलेचे दात पाडले, एकाला अटक; पिंपरी मधील घटना

SBI बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात; पिंपरी येथील घटना

आळंदी येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक; दोन महिलांची सुटका

Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याच्या काँग्रेस-शिंदे गटाच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांच्या रक्तात’

विमानाचे तिकीट देण्याच्या बहाण्याने फसवणूक, रावेत येथील प्रकार