अजित पवारांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी केलं ‘हे’ ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि रातोरात राज्यात भाजप सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाले मात्र अखेर राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर अजित पवार यांनी आपला राजीनामा दिला. परिणामतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला आणि अल्पावधीसाठी राज्यात सत्तेत आलेले भाजप सरकार कोसळले.

त्यानंतर महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आज सकाळी विधानभवनात सर्व आमदारांचा शपत विधी सोहळा पार पडला यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्वतः नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत केले. यावेळी आलेल्या अजित पवार यांची देखील सुप्रिया सुळे यांनी गळाभेट घेतली. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये त्या म्हणतात, दादा राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी आज विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. तत्पुर्वी आम्हा दोघा भावंडांची सभागृहाबाहेर भेट झाली. यावेळी त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. ही भेट आम्हा सर्वांसाठी आनंददायी ठरली.

अजित पवार आता पुढे काय करणार ?
अजित पवारांनी बंडानंतर घरवापसी केली मात्र अजित पवार आता पक्षात पुन्हा आधीसारखे सक्रिय होणार का आणि मंत्रिमंडळातही दिसणार का, याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे. अजित पवारांचा काम करण्याचा अनुभव दांडगा आहे त्यामुळे अजित पवार मंत्रिमंडळात परतणार का ? एवढ्या नाट्यमय घडामोडींनंतर पक्ष सुद्धा अजित पवार यांच्यावर किती विश्वास ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com