ट्विटरवरून राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांवर ‘निशाणा’ ! ‘चले जाव, पुणेकरांचा बाणा, दुरचा नको घरचा आणा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांत पाटील हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघामध्ये त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला. विरोधानंतर मी कुणी परका नसून पुण्याचाच असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्यावर कार्टूनद्वारे निशाणा साधला आहे. यामध्ये कोथरुडमधील स्थानिक नागरिक चले जाव असे म्हणत आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील मी कुणी परका नसून पुण्याचाच आहे असे सांगत आहेत. राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांवरील हे कार्टूनचे ट्विट केले आहे. त्यामुळे आगामी काळाता भाजप आणि राष्ट्रवादीमध्य ट्विट युद्ध रंगणार असल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मी 13 वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना पुण्यात बऱ्याच वेळा गेलो आहे. पुणे, कोथरूड मला जितके माहित आहे तितके कोणालाच माहित नसेल. तसेच मी बारा वर्षे पुणे पदवीधरचा आमदार होतो. तर आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्यात आलो. त्यामुळे मी पुणेकरांना परका नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

Visit : Policenama.com