नेहा आणि रोहनप्रीत सिंगचे ‘रोका’ सेरेमनीचे फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलीवूडची प्रसिध्द गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी गायक आणि अभिनेता रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. नेहाने तिच्या आणि रोहनच्या रोका सेरेमनीचे( roka-ceremony) व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले असून यात दोघे डान्स ( dance)करताना दिसून येत आहेत.
नेहा आणि रोहनप्रीत सिंग दि. 26 ऑक्टोंबरला दिल्लीत विवाह करणार आहेत. तत्पूर्वी 22 ऑक्टोंबरला ते रजिस्टर मॅरेज करणार आहेत. नेहाने सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोष्टमध्ये तिच्या आणि रोहनप्रतीच्या पहिल्या भेटीबाबत सांगितले होते. तो दिवस जेंव्हा त्यांनी मला त्याच्या आई- वडिलासह कुटुंबाची ओळख करून दिली होती. लव्ह यू रोहनप्रीत, नेहू- प्रीत असे नेहाने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे.
दोन दिवसापूर्वी रोहनप्रीतने आपल्या पोष्टमध्ये लिहले होते. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले होते. मी शब्दात सांगू शकत ती गोष्ट माझ्यासाठी किती महत्वाची होती. जणू संपूर्ण जगाने माझा हात धरला होता.

You might also like