नीरा नदीवरील पुलावरील साईटपट्टया चिखलमय झाल्याने अपघाताला मिळतेय निमंंत्रण

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंम्मदगौस आतार) –  आळंदी ते पंढरपूर पालखीमार्गावरील पुणे – सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीवरील मोठ्या नविन पुलाची साईटपट्टी व फुटपाथ चिखलमय झाला आहे. या पुलावरून जाताना दुचाकीस्वारांना व पायी चालणाऱ्यांंना अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने नीरा नदीवरील पुलाच्या साईटपट्टयांंची स्वच्छता करण्याची मागणी प्रवाशी व नागरिकांमधून होत आहे.

आळंदी ते पंढरपूर पालखीमार्गावरील पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत असलेल्या नीरा नदीवरील मोठ्या नवीन पुलावरून साताराहुन नगरकडे व पुण्याकडे जाणाऱ्या मोठ्या अवजड वाहणांची तसेच पुणेहून पंढरपूरकडे जाणा-या वाहणांची मोठी वर्दळ असते. दरवर्षी माऊलींंच्या पालखी सोहळ्यादरम्यान या पुलावरील साईटपट्टयांंची स्वच्छतासह पुलाची रंगसफेदी देखील केली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींचा पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याने नीरा नदीवरील नविन पुलाची स्वच्छता करण्यात आली नाही. तसेच पावसामुळे नीरा नदीच्या मोठ्या पुलावरील साईट पट्टयांंमध्ये चिखलाचा थर मोठ्या प्रमाणात साठल्याने पुलावरून अवजड वाहन वेगाने जात असताना दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन दुचाकी चालवावी लागते. त्यामुळे दुचाकीस्वार साईटपट्टीतील चिखलावरून घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच फुटपाथ मध्येही पावसाचे पाणी व चिखल साचल्याने पायी चालणाऱ्यांंना देखील पुलावरून जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याने नीरा नदीवरील पुलावरील साईटपट्टयांंची स्वच्छता करण्याची मागणी प्रवाशी व नागरिक करीत आहे.

दरम्यान, नीरा नदीवरील पुल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर करण्यात आल्याने या पुलाची स्वच्छता तातडीने करण्याची मागणी नीरा येथील जाणकार नागरिक करीत आहे.