ताथवडेत हॉटेल चालकास लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – कोयत्याचा धाक दाखवून चोरटयांनी हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम, मालकाची सोन्याची चेन आणि एक लॅपटॉप असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना ताथवडे येथे घडली.
या प्रकरणी राहुल प्रसाद मापारी (३२, रा. ताथवडे) याने फिर्याद दिली आहे. तर चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मापारी याचे ताथवडे येथे ‘कबाब अँड बिर्याणी कॉर्नर’ नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास मापारी हॉटेल बंद करत असताना चौघे त्या ठिकाणी आले. त्यांनी मापारी यांना कोयत्याचा धाक दाखवून गल्यातील १५ हजारांची रोकड, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्ती चोरून नेला. तपास वाकड पोलीस करत आहेत.