परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला राष्ट्रीय सेवा शिबीरातून मिळते : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – केवळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शिबिर करावयाचे नाही तर ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, रूढी-परंपरा अनुभवण्यासाठी अशी शिबिरे उपयोगी ठरत असतात. विविध परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. तर या दृष्टीने जीवन जगण्याचे कौशल्यही मिळते. जैवविविधतेच्या बाबतीत चांगले संशोधन आणि कृतीची गरज आहे याविषयीची प्राथमिक माहिती देखील या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर-माळवाडी नं.२ येथे बोलताना व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील हे इंदापूर येथिल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आयोजित माळवाडी नं.२ , येथिल राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे शेलारमामा सुवर्णपदक विजेते प्रा. दत्ता रास्ते, सुवर्ण पदक विजेत्या श्रीमती. निलीमाताई पवार, हर्षदा बारवकर, वैष्णवी शिंदे यांचेसह, राष्ट्रीय सेवा योजनेच्या लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झालेल्या कुमार शिंदे यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
Indapur

दिनांक ३ जानेवारी ते ९ जानेवारी या दरम्यान विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या गावातील स्वच्छता, ग्रामीण जीवन, जैवविविधता, बाजार, भूमी, पाणी, प्राणी याविषयीची माहिती संकलित करणार असुन विविध विषयावर जाणीव जागृती देखील करणार आहेत. शिबिराचे उदघाटन संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी केले. हर्षवर्धन पाटील यांनी आज भेट देऊन, कामाची पाहणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, माजी सरपंच संजय गार्डे, उपसरपंच दत्तात्रय पांढरे, उपप्राचार्य नागनाथ ढवळे, राजू गार्डे, बापू गार्डे, ग्रामपंचायत सदस्य सतीश मोरे, लक्ष्मण चौधरी, डॉ. शिवाजी वीर, प्रा. मनोहर बेद्रे उपस्थित होते. प्रास्ताविक गौतम यादव यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/