आ.संजय जगताप आणि पदाधिकाऱ्यांनी दिली जि.प.प्राथमिक शाळेला भेट

जेजुरी  : पोलीसनामा ऑनलाइन  (संदीप झगडे) – आज मंगळवार दि.१८/०२/२०२० रोजी पुरंदर हवेली तालुक्याचे आमदार मा.संजयजी जगताप यांनी जि. प. प्राथमिक शाळा कदमवस्ती येथे सदिच्छा भेट दिली. येथील सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून कौतुक केले.

आमदार संजय जगताप व सर्व सन्मानणिय शाळेची गुणवत्ता पाहून थक्क झाले.शाळेला इमारत खोल्या व बसायला जागा कमी पडत असल्याने विद्यार्थी पटसंख्या ५० असून आणखी ४० प्रवेश वेटींगवर आहेत हे ऐकून आमदार साहेबांनी कदमवस्तीच्या ग्रामस्थांनी शाळेसाठी दिलेल्या ११ गुंठे जागेमध्ये लवकरात लवकर अत्याधुनिक इमारतीसह पुरंदर तालुक्यातील एक आदर्श व मॉडेल स्कूल शोभावे असे भव्य व देखणे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने करु असे सांगितले.

 

सुमारे चार तास आमदार साहेब व सर्व मान्यवर कदमवस्ती शाळेमध्ये रमले होते. येथील गुणवता व सर्वच विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर,विद्यार्थ्यांचे वकृत्व,इंग्रजी विषयावरील प्रभूत्व, गणिती क्रियासह अब्जापर्यंतच्या सहजतेने संख्यालेखन पाहून सर्वच मान्यवर भारावून गेले.

यावेळी पुरंदरच्या तहसिलदार मा.रुपाली सरनोबत, पुणे जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरंगे, पुणे जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकिरी मा.संध्या गायकवाड, पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मा.रामदास वालझाडे,डाएटचे अधिव्याख्याते व मार्गदर्शक कृष्णा फडतरे, लोकमतचे वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी बी.एम काळे, गटसमन्वयक संजयजी चव्हाण,आदर्श केंद्रप्रमुख सतिशजी कुदळे,आदर्श केंद्रप्रमुख अनिल जगदाळे , मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खाडे, सकाळचे पत्रकार शिक्षक नेते तानाजी झगडे,बेलसरचे सरपंच सौ. स्वातीताई गरुड, साकुर्डेचे सरपंच सविताताई जगताप, एखतपूर मुंजवडीच्या मा.सरपंच राणीताई झुरंगे व गरुड,धिरज जगताप, रणधिर जगताप,निलेश जगताप, संग्राम सस्ते, युवराज जगताप,मारुती सस्ते, राजेंद्र सस्ते,पोपट जगताप,शिवराज सस्ते, यांसह बहुसंख्येने कदमवस्तीसह परिसरातील पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.