रोहित पवारांची रणनीती उलटवण्याचा डाव, राष्ट्रवादीची यंत्रणा ‘अस्वस्थ’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पवार कुटुंबियांचे राजकीय वारसदार होण्याची इच्छा बाळगून असलेले रोहित पवार यांची प्रचाराची रणनीती त्यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांची गोची करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पवार कुटुंबियांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही लोक मदत करत आहेत. त्यामुळे रोहित पवार समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. पवार कुटुंबीयांचे राजकीय वारसदार पवार असू शकतात, असे सूचक विधान काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी केले होते. पार्थ पवार यांच्या पराभवामुळे पवार कुटुंबीयांवर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बारामतीची विशेष ताकद कर्जत-जामखेड मतदारसंघात कार्यरत आहे. मात्र पवार कुटुंबियांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांना खिंडीत पकडण्यासाठी वेगवेगळे आखाडे बांधले जात असल्यामुळे रोहित पवार समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व पवार कुटुंबीय कर्जत-जामखेडमध्ये सक्रिय आहेत. मात्र राष्ट्रवादीतील रोहित पवार यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्त्यांची बोटचेपी भूमिका पवार कुटुंबीयांसाठी अडचणीची ठरणार आहे.

Visit : Policenama.com 

You might also like