‘रेझींग डे’ निमित्त पोलिसांनी शस्त्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिके व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले धडे

मुरबाड पोलीसनामा ऑनलाईन : अरुण ठाकरे – महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त मुरबाड पोलिस स्टेशनच्या वतीने आज मुरबाडच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबाबत जनजागृती व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुरबाडच्या तीनहात नाका पोलिस चौकी येथे विविध वाहन चालकांना वाहतूकीचे नियम, चालकांना वाहतूक व्यवस्थापणा संबंधी मार्गदर्शन, पोलीस प्रशासन व नागरिक यांच्या मध्ये सलोखा कसा राखता येईल ?

या विषयी मार्गदर्शन तसेच शालेय विद्यार्थी यांना कायदेशीर मार्गदर्शन, कामकाजाची माहिती, पोलिसांची शस्त्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिके व मुलींना स्व संरक्षणाचे धडे असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. यासोबतच मंगळवारी न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना व विशेष करून विद्यार्थिनींना सायबर क्राईम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई येथील एस. इन. डी. टी. कॉलेजच्या विद्यार्थिनी विजयता पाटील, श्रुतिका पाटील, राजश्री पाटील, अमृता चव्हाण यांनी जागृती अभियानाच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग यांना मोलाचे मार्गदर्शन करून मोबाईलचा सुयोग्य वापर, सोशल मीडियावरील व्हाट्सएप, फेसबुक सारखे ऍप्स व त्यातील सुरक्षिततेबाबत सूचना व प्रात्यक्षिके करून दाखविले.

तसेच सायबर क्राईमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकींपासून सावध राहण्याबत उपाययोजना यावर विशेष भर देण्यात दिले. याप्रसंगी कार्यमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राकेश पाडवी सर तसेच व्यासपीठावर मुरबाड पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक विनायक खेडकर, महिला पोलीस कर्मचारी गीता पारधी, पत्रकार किशोर गायकवाड, जेष्ठ शिक्षक प्रदीप पाटील सर, शिक्षिका निरंतर मॅडम उपस्थित होत्या. तर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/