‘नो-प्लॅन, ओन्ली अ‍ॅक्शन’ : पोलिस आयुक्‍त संदीप बिष्णोई

केलेल्या कामात समाधान : मावळते आयुक्‍त आर.के. पद्मनाभन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना योग्य न्याय मिळवून देणे, कायदा सुव्यवस्था राखणे, वाढती गुन्हेगारी रोखणे आणि नवीन टेक्नोलॉजीचा वापर याला प्राधान्य देणार आहे. माझी कोणतेही योजना नाही तर थेट कृती असेल असा विश्वास पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी व्यक्त केला. तर मी माझ्या कार्यकाळात केलेल्या कामात समाधानी असल्याचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी सांगितले.

मावळते पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडून नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज पदभार स्वीकारला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिष्णोई यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कामगिरीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संदीप बिष्णोई म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारला आहे. आल्याबरोबरच विधानसभा निवडणुक आणि नवरात्री उत्सव तोंडावर आहेत. सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आढावा घेणार आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी निवडणुकीत काम करण्याचा अनुभव आहे. या पोलीस आयुक्तालयाची गेल्या वर्षी स्थापना झालीयं. शुन्यातून इथला कारभार सुरू झाला होता. काही त्रुटी कमतरता असतील. परंतू इथून पुढे पोलीस आयुक्तालय नेण्याचे काम करणार आहे. पोलीस आयुक्तालयात ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. गुन्हेगारीला आळा बसविण्यात येईल. पोलीस यंत्रणाच चांगली असेल तर गुन्हेगारी आटोक्यात येण्यास काहीच अडचण येणार नाही. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलीस यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुढे ते म्हणाले की, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. शहराचा आढावा घेऊन कायदा सुव्यवस्था चोख राखली जाईल याकडे लक्ष देणार, निवडणुक शांततेत पार पडेल यासाठी प्रयत्न करणार आहे.

Visit – policenama.com