मित्राचा खून करणारा अटकेत ; नातेवाइकांची आरोपीच्या घरावर दगडफेक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – दारु पिल्यानंतर झालेल्या वादातून मित्राचा खून करुन पसार झालेल्यास चिखली पोलिसांनी अटक केली आहे. तर खून झालेल्याच्या नातेवाइकांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली.

सनी घाटोळकर याचा खून झाला. तर प्रतीक उर्फ मोन्या मोरे याला अटक केली. सनी आणि प्रतीक हे मित्र आहेत. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रतिकने डोक्यात दगड घालून सनीचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला. आरोपी प्रतीकची माहिती पोलीस कर्मचारी नरहरी नाणेकर आणि होले यांना मिळाली. त्यानंतर चिखलीच्या तपासी पथकाचे उपनिरीक्षक संदीप बागुल आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

दरम्यान सनी याच्या नातेवाईकांनी विठ्ठल यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच विठ्ठल यांच्या घरातील फ्रीज आणि अन्य सामानाची तोडफोड केली. हा प्रकार गुरुवारी पहाटे साडे बारा ते शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. या प्रकरणी विठ्ठल लक्ष्मण मोरे (७०, रा. शरदनगर चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Loading...
You might also like