निगार जौहर बनल्या पाकिस्तानी सैन्याच्या इतिहासातील प्रथम महिला लेफ्टनंट जनरल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   पाकिस्तान लष्कराने मेजर जनरल निगार जोहर यांची पहिली महिला लेफ्टनंट जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानच्या मीडिया विंगने मंगळवारी सांगितले की, प्रथमच पाकिस्तान लष्कराने मेजर जनरल निगार जोहर या महिला अधिकारीला लेफ्टनंट जनरल म्हणून नियुक्त केले आहे. मेजर जनरल निगार जोहर यांना थ्री-स्टार जनरल म्हणून प्रतिष्ठित पद मिळाले आहे, तर त्यांना पाकिस्तान लष्कराच्या पहिल्या महिला सर्जन जनरलपदीही नियुक्त करण्यात आले आहे.

आयएसपीआरचे महासंचालक यांनी ट्विट केले

फ्टनंट जनरल म्हणून पदोन्नती झालेल्या पहिल्या महिला अधिकारी असल्याचे आंतर-सेवा जनसंपर्क (आयएसपीआर) महासंचालक, मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी ट्विट केले. या अधिकाऱ्याला पाक सैन्याच्या पहिल्या महिला सर्जन जनरल म्हणून नियुक्त केले आहे.

जोहर यांनी 1985 मध्ये रावलपिंडीच्या आर्मी मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि आर्मी मेडिकल कोरमध्ये रुजू झाले. सन 2017 मध्ये, त्या मेजर जनरल पद मिळविणाऱ्या पाकिस्तानी लष्कराची तिसरी महिला अधिकारी बनल्या आहेत. त्यांच्याखेरीज शाहिदा बादशाह आणि शाहिदा मलिक हे दोन प्रमुख आहेत. जोहरचे वडील आणि पती दोघेही सैन्यात अधिकारी म्हणून काम करत आहेत.