फक्त ‘हिरव्या’ भाज्याच नाही तर ‘लाल’ देखील आपल्याला ‘फिट’ ठेवू शकतात, जाणून घ्या फायदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिरव्या भाज्यांचे महत्व अनेक लोकांना माहित आहे. हिरव्या भाज्यांमध्ये पौष्टिक घटक भरपूर असतात. हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते. परंतु लाल रंगाच्या भाज्या देखील शरीरासाठी गुणकारक असतात हे क्वचितच लोकांना माहित असते. लाल रंगाच्या सर्व फळ आणि भाज्यांमध्ये लाइकोपीन, अँथोसायनिन्स सारख्या भरपूर अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे हृदयरोग आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. फळे आणि भाज्यांचा रंग जास्त गडद, त्यात अधिक खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जाणून घ्या कोणत्या लाल भाज्या आणि फळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात.

Related image

बीट –
बीटरूट हे पोटॅशियम, फायबर, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि नायट्रेटचा चांगला स्रोत आहे. बीटरुट खाल्ल्यास किंवा त्याचा रस सेवन केल्यास रक्तदाब, रक्त प्रवाह आणि प्रतिकारशक्ती सुधारली जाऊ शकते. त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि के मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

Image result for tomato

टोमॅटो –
हे लाइकोपीन, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम समृद्ध आहे. टोमॅटो लाइकोपीनचा उत्तम स्रोत आहे, ज्यामधून आपल्याला सुमारे 85 टक्के लाइकोपीन मिळते. याद्वारे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

Related image

लाल गाजर – 
यात पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, लाइकोपीन, मॅंगनीज, तांबे, लोह, कॅल्शियम , फायबर आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते.

Image result for डाळिंब

डाळिंब – 
डाळिंबाला गुणांची खाण म्हणतात. एका संशोधनानुसार डाळिंबामध्ये ग्रीन टी आणि रेड वाइनपेक्षा 3 पट जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. डाळिंबामध्ये फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटॅशियम असतात. डाळिंबामुळे शरीरात रक्त सुरळीत राहतो. रक्ताशी संबंधित रोग देखील दूर राहतात.
Related image

कांदा –
त्यामध्ये ऑर्गनोसल्फर आढळतो. ऑर्गनोसल्फर एक फोटोकेमिकल आहे जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते . यकृतसाठी देखील फायदेशीर असते. व्हायरस आणि जिवाणूजन्य रोगांपासून होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like