‘राहुल यांनी जिन्ना आडनाव लावावं’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काहीच दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याला मंजुरी देण्यात आली असून हा देशभरात लागू करण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसने पहिल्यापासूनच या कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘भारत बचाओ’ रॅली काढली. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

‘मी रेप इन इंडिया विधानाबद्दल माफी मागणार नाही’ असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही, असं खळबळजनक विधान राहुल यांनी यावेळी म्हणाले. मात्र, त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले असून भाजपा नेत्यांनी राहुल यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

‘भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी राहुल यांनी जिन्ना आडनाव लावावं, असा सल्ला दिला आहे. राव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसलादेखील टॅग करत लिहिले कि, ‘तुम्हाला गांधी नव्हे, जिन्ना आडनाव जास्त शोभून दिसेल. मुस्लिमांच्या धार्जिन्य राजकारणामुळे आणि मानसिकतेमुळे तुम्ही सावरकरांचे नाहीत, तर मोहम्मद अली जिन्नांचे योग्य वारसदार शोभता,’ असा घणाघात राव यांनी राहुल यांच्यावर केला.

तसेच, भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गिरीराज यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो ट्विट करत लिहिले कि, ‘वीर सावरकर खरेखुरे देशभक्त होते. आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होत नाही, कोणी देशभक्त होऊ शकत नाही. देशभक्त होण्यासाठी शुद्ध हिंदुस्तानी रक्त असायला हवं. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटलं आहे. मात्र आता तसं होणार नाही. हे तीनजण कोण आहेत? हे तिघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का?,’ असा सवाल गिरीराज यांनी यावेळी उपिस्थत केला आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारत धगधगतो आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी माफी मागणार नाही, असं राहुल यांनी स्पष्ट केली. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणतील होत. मोदींच्या या विधानाची आठवणदेखील राहुल यांनी यावेळी करून दिली.

सरम्यान, देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांना धरेवर धरले आहे. झारखंडमधील सभेत राहुल म्हणाले कि, ‘मेक इन इंडिया’ अशी घोषणा मोदी यांनी केली होती, मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. राहुल यांच्या या टिकेवरून काल संसदेत गोंधळ उडाला. त्यामुळे राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली. मात्र राहुल यांनी त्यांच्या या विधानावर माफी मागण्यास नकार दिला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like