कमांडो ट्रेनिंग घेणार्‍या अमेरिकन लेडीनं पाकिस्तानात राहुन केला ‘हंगामा’, बेनजीर भुट्टोंच्या ‘सेक्स’ लाईफबद्दल केलं ‘हे’ विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेच्या एका महिलेने पाकिस्तानच्या लोकांचे मन हादरवले आहे. सिंथिया डी रिची असे या महिलेचे नाव असून ती स्वतःला ऍडव्हेंचर प्रेमी, चित्रपट निर्माता, पत्रकार आणि ब्लॉगर म्हणून सांगते आणि सध्या वादात आहे. पाकिस्तानच्या महिला कमांडोसह त्यांच्या सारख्या गणवेशात प्रशिक्षण घेणारी सिंथिया अमेरिकन आहे, पण सध्या पाकिस्तानामध्ये राहून तेथील रिपोर्ट देत आहे.

रिचीने पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्याबाबत असे काही लिहिले आहे आणि बोलली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. रिचीने बेनझीर यांच्यावरील आपली भूमिका योग्य ठरवण्यासाठी ‘इंडिपेन्डंट करस्पॉन्डन्ट: सिक्रेट सेक्स लाइफ ऑफ बेनझीर भुट्टो’ या पुस्तकाचे मुख्य पृष्ठ पोस्ट केले. रोशन मिर्झा यांनी लिहिलेल्या या पुस्तकात काही हाय प्रोफाइल पाकिस्तानी महिलांच्या सेक्शुअल ऍडव्हेंचरचा उल्लेख आहे. रोशन मिर्झा यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, या स्त्रिया आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांचा वापर करतात. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या महिला कोणत्याही सेक्शुअल लिबरल देशातील नसून पाकिस्तानच्या राजकीय घराण्यातील आहेत.”

एवढेच नव्हे तर रिचीने पाकिस्तानमधील अन्य हाय प्रोफाइल प्रकरणांबद्दलही इतर खुलासे केले आहेत. तिने अनेक मंत्र्यांचे मुलींबरोबर मजा केल्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ज्याबाबत अनेकांनी तिच्यावर टीका केली आणि काहीजण म्हणाले की ती सत्याची लढाई लढत असल्यामुळे पाठिंबा आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्याविरूद्ध घृणास्पद वक्तव्य केल्याबद्दल रिचीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पीपीपीचे पेशावर जिल्हाध्यक्ष जुल्फिकार अफगाणी यांनी गुलबहार पोलिस ठाण्यात ब्लॉगरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे स्पष्ट दिसत आहे की, सत्ताधारी प्रतिष्ठान आणि आयएसआय रिचीचा वापर मुख्य विरोधी पक्ष पीपीपीच्या विरोधात केला जात आहे. पीपीपीच्या महिला शाखेच्या प्रांतीय माहिती सचिव अ‍ॅडव्होकेट मेहर सुलताना यांनी माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याविरूद्ध ‘घृणास्पद व निंदनीय विधानां’मुळे रिचीला देशातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे. पीपीपी नेत्याने मंगळवारी आपल्या निवेदनात म्हटले की, दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्याविरोधात रिचीच्या आढावा लेखामुळे पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, गेल्या आठवड्यात पीपीपीने रिचीविरोधात फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सायबर क्राइम शाखेत माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याविरूद्ध ‘घृणास्पद बदनाम करणारे विधान’ केल्यामुळे तक्रार दाखल केली तेव्हा खळबळ उडाली होती. पीपीपीचे वकील म्हणाले की, रिचीने आपल्या ट्विटमध्ये बेनझीर आणि त्यांचा नवरा आसिफ अली जरदारी यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय विधाने केली आहेत.