PAKचे ‘नापाक’ कारनामे सुरूच, सीमेवर भारतीय सैनिकांवर केला गोळीबार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे नापाक कारनामे अजून सुरूच आहेत. पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैनिकांवर गोळीबार केला आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील शहापूर आणि केरनी सेक्टर मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार गोळीबार केला आहे. यावेळी पाकिस्तानने युद्ध विरामाचे उल्लंघन केले.

पाकिस्तानने पुन्हा केला आयबीवर हल्ला
या आधीही पाकिस्तानने रात्रीच्या बारा वाजता आंतरराष्ट्रीय सीमेवर हिरनानगर सेक्टरमध्ये जोरदार गोळाबारी केली. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या धमक्यांमुळे लोकांची रात्री झोप उडाली. नजदिकच्या लोकांनी पूर्ण रात्र दहशतीखाली काढली तर दुसऱ्या दिवशी पासून परिसरातील पाच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

या आधी देखील पाकिस्तानी सेना व रेंजर्स यांनी कठुआच्या हीरानगर मधील अंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पुंछच्या बालाकोट मधील सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आहे. पाकिस्तानि सैनिकांनी एका शाळेवर निशाणा साधला होता, यामुळे घाबरलेले विद्यार्थी चार तास शाळेत अडकून होते. पाक गोळाबारी लक्षात घेता हीरानगरच्या पाच शाळांना पानसर, कड़याला, रठुआ, गुज्जर चक्क आणि मन्यारी बंद ठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like