#BirthdaySpecial : अभिनेत्री परिणिती चोपडा दीड वर्ष डिप्रेशनमध्ये होती, वजन कमी करण्यासाठी केले 10 लाख खर्च !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस परिणिती चोपडा आज (22 ऑक्टोबर) आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. परिणितीने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ कोणता होता हे तिने सांगितले आहे.

परिणिती म्हणाली, “2014 ते 2015 काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. जेव्हा माझे सिनेमे काही खास नव्हते. दावत-ए-इश्क आणि किल दिल या सिनेमांनी खास कमाल नाही केली. हे माझ्यासाठी खूप मोठं अपयश होतं. यानंतर माझ्याकडे काम नव्हतं. माझ्या कमी पैसे शिल्लक होते.”

परिणिती सांगते, “माझ्याकडे पैसे नव्हते अशात मी एक घर खरेदी करून ठेवलं होतं. त्यामुळे माझी खूपच अडचण सुरू होती. पैसे नव्हते तर मला चांगलं वाटत नव्हतं. मी जेवण बंद केलं होतं. मी फक्त रुममध्ये बसून होते आणि टीव्ही पहात रहायचे.”

View this post on Instagram

👠

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

परिणिती एका मुलाखतीत म्हणाली, “माझं वजन 86 किलो झालं होतं. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मी तब्बल 28 किलो वजन कमी केलं होतं. कपडेही मला फिट येत नव्हते. 10 वेळा विचार करावा लागत होता. नंतर मी फिटनेसवर फोकस केला. मी ऑस्ट्रीयामध्ये डिटॉक्स प्रोग्रॅम जॉईन केला. यासाठी मी 10 लाख रुपये खर्च केले.”

View this post on Instagram

🌈🏝

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

परिणितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या परिणिती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये खूपच बिजी आहे. सायनाप्रमाणेच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी परिणिती खूप मेहनत करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Floating breakfast? Sure! 💦🦋🍳

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

View this post on Instagram

Holidaying at lightening Speedo! ⛱🍀💦

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

Visit : policenama.com