‘पती’नं ‘धैर्य’ दिल्यानं महिलेची नात्यातील तरुणाविरोधात विनयभंगाची ‘तक्रार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईक असलेल्या तरुणाबरोबर तिचे पूर्वी मैत्रीचे संबंध होते. पण नंतर तिचे लग्न झाले. तरी या मैत्रीच्या संबंधात असताना काढलेले फोटो मिडियात व्हायरल करेल, अशी तो धमकी देत होता. तिला आपल्याबरोबर अश्लिल चाट कर नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकी देत होता. नंतर तर त्याने आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. ही गोष्ट पतीला समजल्यावर त्याने आपल्या पत्नीला धैर्य दिले. त्यामुळे या महिलेने आता या नातेवाईक तरुणाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

सांगवी पोलिसांनी कोल्हापूरातील शाहुवाडी येथील २५ वर्षाच्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली असून जुलै २०२९ पासून २५ डिसेंबरपर्यंत हा प्रकार सुरु होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा या महिलेच्या नात्यातील आहे. नातेवाईक असल्याने त्यांची पूर्वी मैत्री होती. त्यानंतर या महिलेचे लग्न झाले. जुलै २०१९ मध्ये महिलेने या तरुणाला तु मला फोन करु नकोस व भेटु नकोस. तुझ्यामुळे माझ्या घरी भांडणे होतात, असे सांगितले.

तरीही तो या महिलेला वारंवार फोन करुन तु मला आवडतेस, तु माझ्याशी अश्लिल बोलत जा. अश्लिल चाट करत जा. नाही तर मी तुझ्या पतीला व इतर नातेवाईकांना तुझे आणि माझे लफडे होते, असे सांगून तुझी बदनामी करीन अशी धमकी देत असे. त्यामुळे या महिलेने त्याचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर मंगळवारी २४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ही महिला सोसायटीतून बाहेर पडल्यावर गेटबाहेर त्याने तिला अडवले.

तिचा हात धरुन तु आताच्या आता माझ्यासोबत चल, मला तू खूप आवडते. तु माझे ऐक नाही तर तुमची मिडियात बदनामी करीन, असे म्हणून त्यांचा हात ओढून मनास लज्जा होईल, असे कृत्य केले. परंतु, समाजात बदनामी होऊन म्हणून त्यांनी तक्रार दिली नाही. हा तरुण अजूनही त्रास देत असल्याचे समजल्यावर पतीने या महिलेला धैर्य दिले. त्यानंतर बुधवारी या महिलेने फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/