अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी ‘या’ कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे : आमदार किसन कथोरे

मुरबाड  : पोलीसनामा ऑनलाईन(अरुण ठाकरे) –  मुरबाड येथील कोविड रुग्णालयात सुविधा नाहीत असे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना कोविड रुग्णालया मध्ये दाखल केले पाहिजे मग त्यांना सुविधा उपलब्ध आहेत की नाही हे समजेल अशी तीव्र टीका मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार यांचे विरोधात केली आहे अशा बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांनी खाजगी रुग्णालयाच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत असा आरोप त्यांनी काही पत्रकारांना दिलेल्या मुलाखती मध्ये व्यक्त केला आहे.

मात्र पत्रकारांनी आमदार यांच्या आरोपावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून 9 जुलै रोजी मुरबाड येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांचे हस्ते झाले तेथे काही सुविधा नसतील त्याचे वृत्त प्रकाशित करून पत्रकारांनी प्रशासनाला जागआणण्यासाठी प्रयत्न केले त्याचा हेतू लोकांची सोय व्हावी असा असताना त्याबद्दल आमदार यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असल्याची चर्चा आहे
शासकीय कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा नाही 75 खाटापैकी 50 खाटावर गाद्या नाहीत अशी बातमी काही वर्तमान पत्रात मंगळवार ता 14 जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे त्याची दखल घेऊन तातडीने मंगळवारी रात्रीच गाद्या आल्या , व्हेंटिलेटर आणण्यासाठी आज बुधवारी सकाळी गाडी पाठविण्यात आली आहे तर डॉक्टर सुद्धा आणण्याची कार्यवाही सुरू आहे

मुरबाड येथील कोविड रुग्णालय सुरू व्हावे म्हणून आमदार किसन कथोरे याांनी सरकार विरोधात संघर्ष केला मात्र कोविड सेंटर मध्ये जे काही कमी आहे तेच पत्रकारांनी लिहिले बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी तेथे काय कमी आहे याबाबत संबंधित डॉकटर यांचे कडून खात्री केली तेथे आणखी डॉकटर नेमण्याची गरज आहे ही वस्तुस्थिती मान्य करून सुविधा व डॉकटर मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केल्याचे डॉक्टरांनी सांगितले म्हणून बातम्या देण्यात आल्या त्याची दखल घेऊन प्रशासनाला जागे करण्या ऐवजी पत्रकारांना धमकी देणे ही आमदार कथोरे यांची भूमिका कोणीतरी चुकीची माहिती दिल्यामुळे निर्माण झाली असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर तो घाला आहे अशी प्रतिक्रिया पत्रकार व्यक्त करत आहेत

चौकट

मुरबाड येथील शासकीय कोविड रुग्णालयात उत्तम व्यवस्था आहे या बाबत उठलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे