31 पैसे प्रति लीटरने वाढले पेट्रोलचे दर : डिझेलच्या भावात देखील झाली ‘इतकी’ वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. इंडियन ऑईलकडून मिळालेल्या माहितीनुसार,राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यामध्ये पेट्रोलचे भाव 24-31 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. तर डिझेलचे भाव 24-26 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. त्याआधी शुक्रवारी देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते.

यानंतर आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73.35 रुपये लिटर झाले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत डिझेलचे देखील भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दिल्लीत आज डिझेलचा दर 66.53 रुपये प्रतिलिटर झालं आहे. तर कोलकात्यात पेट्रोलच्या दरात 28 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 79.02 रुपये लिटर झाले आहेत. मुंबईत आज डिझेलचा दर 69.79 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलच्या दरात लिटरमागे 25 पैश्यांची वाढ झाली आहे. चेन्नईत पेट्रोलच्या दरात 31 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 76.24 रुपये लिटर झाले आहेत.

सकाळी सहा वाजता बदलते किंमत
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता दररोज बदल होत असून नवीन दर रोज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. यामध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश करून भाववाढ केली जाते.

एसएमएस द्वारे तुमच्या भागातील दर मिळवा
तुमच्या भागातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही एसएमएसच्या मदतीने मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज येतो. प्रत्येक मोबाईल कंपनी आपल्या ग्राहकांना हि सुविधा पुरवत असते. विविध कंपन्यांच्या कोड क्रमांक टाकून तुम्ही मॅसेज केल्यास तुम्हाला याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

visit : Policenama.com