पिंपरीतील ‘साईराज’ लॉजवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’, 5 मुलींची ‘सुटका’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सोमाटणे हद्दीतील साईराज लॉजवर सुरु असणाऱ्या वेश्या व्यवसायावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली. तसेच एकाला अटक केली आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली आहे. समीर उर्फ तय्यब पापभाई सय्यद (३८, रा. थेरगाव, पुणे) असे पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

सोमाटणे हद्दीतील साईराज लॉज मध्ये महिलांकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना मिळाल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, कर्मचारी आशा घाटे, बंडू मारणे, दिलीप कदम, मनोज गुरव, अमोल गोरे, महेंद्र रावते, सतीश मिसाळ, विकास तारू, अतिष जाधव आदींनी साई राज लॉज मध्ये सापळा रचून तपासणी केली असता, अवैध ५ पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असताना, आरोपी समीर उर्फ तय्यब सय्यद याला अटक केली.

पीडित महिलांची पुणे महिला सुधारगृहात रवानगी केली. आरोपीला अटक करून रविवार (दि.२) सकाळी मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी आरोपीला मंगळवार (दि.४) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.