डेंगूमुळे पिंपरी चिंचवडमध्ये महिन्यात 2 भावांचा मृत्यू

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – डेंगूच्या आजाराने थेरगावातील एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा आज मृत्यू झाला. एकाच महिन्यात दोन सख्या भावंडाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उजेर हमीद मणियार (वय-4) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून त्याचा आज पहाटेच्या सुमारास सुरु असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आगोदर नोव्हेंबर महिन्यात त्याचा सख्खा लहान भाऊ अदनान हमीद मणियार (वय- महिने) याचा देखील डेंग्यूने मृत्यू झाला होता.

उजेर याला उपचारासाठी पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान उजेरचा मृत्यू झाला. उजेर याला मागील काही दिवसांपासून ताप आल्याने त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दोघांचाही डेंग्यूने मृत्यू झाल्याने मणियार कुटुंबावर दु:खाचा डोंगर
कोसळला आहे.

दरम्यान, थेरगाव परिसरात आठ महिन्यापूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकले होते. हे काम करताना जुने कनेक्शन मात्र तसेच ठेवले आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्याचे डबके साचून डेंग्यूच्या आळ्यांची उत्पत्ती होत आहे. परिसरातील नागरिकांना डेंग्यूची लागण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like