पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांकडून अटक

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला तपासासाठी घराजवळ आणले असता त्याने नातेवाईकांच्या मदतीने लोहमार्ग पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. हा प्रकार बुधवारी (दि.5) दुपारी पिंपरीतील शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात घडला होता. फरार झालेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी पिंपरीतील नवमहाराष्ट्र शाळेजवळील पीएमटी बस स्टॉपवर सापळा रचून अटक केली.

नदीम गफूर शेख (वय-19) असे अटक करण्यात आलेल्या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे. नदीम शेख याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला चोरीच्या तपासासाठी बुधवारी शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या नातेवाईंकांनी पोलिसांशी वाद घातला. त्यावेळी आरोपीने पोलिसांना धक्का देऊन तेथून पळून गेला. पिंपरी पोलीस आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पिंपरीतील नवमहाराष्ट्र शाळेजवळील पीएमटी बस स्टॉपजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बस स्टॉपजवळ सापळा रचला. आरोपी बसमधून उतरताच त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुणे लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस हवालदार नागनाथ लकडे, अनिल गायकवाड, पोलीस नाईक जावेद बागसिराज, अजिनाथ सरक, पोलीस शिपाई सोमेश्वर महाडीक, उमेश वानखडे, रमेश दोरताले, शहाजी धायगुडे, ओंकार बंड, सुहास डंगारे, गणेश करपे यांच्या पथकाने केली.