पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात दिड वर्षापासून फरार सराईत गुंड अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाच्या गुन्ह्यात दिड वर्षांपासून फरार असलेल्या कुप्रसिद्ध रावन गॅंग चा सदस्याला लातूर येथून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विजय पवार (24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे. तो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या टॉप 25 वॉन्टेड गुन्हेगाराच्या यादीतील गुन्हेगार होता.

दिनांक 5 /10/19 रोजी रात्री देवीची आरती पाहताना झालेल्या वादावरून अमित सुभाष पोटे याचा कोयता लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला होता. तेव्हापासून विजय हा फरार झाला होता. या आरोपीची माहिती खबऱ्याकडून पोलीस शिपाई शामसुंदर गुट्टे याना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने लातूर येथील मु.पो. हडोळती, तालुका अहमदपूर येथून पवार याला ताब्यात घेतला.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपयुक्त सुधीर हिरेमठ साहेब व सहा. पोलीस आयुक्त आर आर पाटील यांनी गुन्हे शाखा युनिट 5 च्या अधिकारी व कर्मचारी यांच अभिनंदन केले आहे .